लातूर येथील जीप - कंटेनर अपघात ९ ठार

जीप - कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात ९ जण ठार झालेत. हा अपघात उदगीरपासून ७ कि.मी. अंतरावर कल्लूर फाट्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. तिघा जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Updated: Jul 17, 2016, 10:15 PM IST
लातूर येथील जीप - कंटेनर अपघात ९ ठार title=

लातूर : जीप - कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात ९ जण ठार झालेत. हा अपघात उदगीरपासून ७ कि.मी. अंतरावर कल्लूर फाट्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. तिघा जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अहमदपूरहून उदगीरकडे चाललेल्या जीपला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात आठ जण जागीच ठार तर एकाचा उदगीरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ही जीप अहमदपूरहून प्रवासी घेऊन उदगीरला जात होती. अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनर सोडून पळून गेला. जखमी तिघांना आधी वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर उदगीरला हलविण्यात आले. मृतांमध्ये दोघे उदगीरचे  असल्याचे सांगण्यात येत आहे.