म्हणून जायकवाडीचं पाणी हिरवं होतंय

मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात हिरवा तवंग निर्माण झाला आहे.

Updated: Oct 9, 2016, 07:19 PM IST
म्हणून जायकवाडीचं पाणी हिरवं होतंय title=

औरंगाबाद : मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात हिरवा तवंग निर्माण झाला आहे. हा तवंग वाढत चालला आहे. गेल्या पाच दिवसात जलाशयाच्या सुमारे 5 किमी परिसर या तवंगाने व्यापला आहे. हे पाणी तातडीनं प्रयोग शाळेत पाठवण्यात आलंय.

गेल्या 8 वर्षांपासून धरणातून पाणीच सोडलेले नाही. त्यामुळे शेवाळ वाढत गेले. काही ठिकाणी तर धरण उघडे पडले होते त्यामुळे शेवाळ वाढले. गेल्या काही दिवसांतल्या पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा झालाय, त्यामुळे शेवाळ वाहत आले म्हणून पाणी हिरवे झाले अशी माहिती अभियंत्यांनी दिलीय. दरम्यान याआधीही 2011 आणि 2013 साली पाणी हिरवे झाले होते. त्यावेळी धरणातून पाणी सोडण्यात आले होते.