अभयारण्याची शान 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता

जिल्ह्यातील उमरेड कराडला या अभयारण्याची शान समजल्या जाणारा 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. 

Updated: Jul 20, 2016, 04:05 PM IST
 अभयारण्याची शान 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता title=

भंडारा : जिल्ह्यातील उमरेड कराडला या अभयारण्याची शान समजल्या जाणारा 'जय' वाघ गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून वनविभाग जयचा शोध घेतंय. पण अजूनही तो सापडू शकला नाही. तो जिवंत किंवा  मृत असल्याचे कुठलेही पुरावे वनविभागाला सापडलेले नाहीत. 

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या वाघांमध्ये जयची गणना होते. अतिशय देखणं आणि उमदं असं हे जनावर आहे. या अभयारण्यात येणा-या पर्यटकांसाठी जय वाघ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. 

या वाघाला सहा माद्यांपासून तब्बल २० ते २२ बछडे आहेत. या जयला पाहण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सचिन तेंडूलकरही या अभयारण्यात आला होता.