अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधवचा भाऊ दिलीप जाधव आणि त्यांची दोन मुले प्रशांत आणि अशोक जाधव या तीन आरोपींविरोधात पाथर्डी पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
१७५६ पानांचे हे आरोपपत्र असून आरोपींनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवण्याच आला आहे. हे हत्याकांड घरगुती वादातून झालं असाव असा अंदाज सर्वप्रथम 'झी चोवीस तास'नं व्यक्त केला होता. त्याचाच प्रत्यत तपासातुन पुढे येताना दिसतोय.
गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथे संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री जाधव आणि मुलगा सुनील जाधव या तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
दिलीप जाधव हा मृत संजयचा सख्खा भाऊ असून प्रशांत आणि अशोक हे संजयचे पुतणे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.