‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

जवखेडा खालसा येथील तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील या तिघांची निघृण हत्या झाली. जाधव कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दलित संघटनांबरोबरच अनेक पुढारीही गावात आले. मात्र जयश्रीचे आई-वडील ज्यांनी मुलगी, जावई आणि नातू गमावला त्यांच्या कडे कोणाचही लक्ष नाही.

Updated: Nov 7, 2014, 07:46 PM IST
‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’ title=

अहमदनगर : जवखेडा खालसा येथील तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील या तिघांची निघृण हत्या झाली. जाधव कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दलित संघटनांबरोबरच अनेक पुढारीही गावात आले. मात्र जयश्रीचे आई-वडील ज्यांनी मुलगी, जावई आणि नातू गमावला त्यांच्या कडे कोणाचही लक्ष नाही.

जयश्री जाधव... माहरेचं नाव जयश्री गायकवाड, मोहन गायकवाड यांची थोरली मुलगी मोहन गायकवाड यांनी आत्ता पासाष्टी पार केलीय. हात-पाय थरथरतायत पण अजूनही काम करतायत… घर चालवायचं म्हणजे काम केलच पाहिजे अशी परिस्थिती. मोहग गायकवाडांना तीन मुलं… मोठी जयश्री, नंतर मुलगा संतोष आणि धाकटी मीरा... जयश्रीला पहिली-दुसरी पर्यंत शिकवलं असेल, असं ते म्हणतात. पण संतोष आणि मीराचं शिक्षण केलं. संतोष गाडीवर ड्रायव्हर आहे. मुलगी जयश्री आणि जावई यांचं चांगलं चाललंय असं म्हंटल्यावर त्यांना धास्ती नसायची... आणि आज अचानक मुलगी, जावई आणि नातू यांची अशा प्रकारे हत्या झाल्यानं हे दु:ख पचवायचं तरी कसं? हा प्रश्न गायकवाड कुटुंबियांना पडलाय.

घटना घडून तीन आठवडे होत आले पण गायकवाड कुटुंबियांना गावकरी वगळता दलितांचे कैवारी म्हणवणाऱ्यांपैकी नेत्यांपैकी कोणीच भेट सुद्धा घेतली नाही. आधीच आभाळाऐवढं दु:ख आणि त्यात मदतीलाही कोणी नाही... त्यामुळे गायकवाड कुटुंबीय अधिकच खिन्न झालेत. आजही बहिणाचा पाहिलेला तो मृतहेद डोळ्यांसमोरुन जात नाही असं सांगताना संतोषचा उर भरुन येतो.
 
शहरी भागात बेटी बचाव अभियान असेल किंवा मुलींना जगण्याचा मार्ग सुकर व्हावा म्हणून अनेक सरकारी योजनांचा, संघटनांचा बोलबाला पहायला मिळतो. इथे मात्र गायकवाड कुटुंबीयांनी लाडकी मुलगी गमावली पण त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणी फिरकलंही नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.