'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

Updated: Jul 27, 2016, 12:01 PM IST
'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे  title=

पुणे / कोल्हापूर : डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

कोल्हापूरात संजय डी पाटील यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा पडलाय. संजय पाटील हे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत. 

कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या त्यांच्या बंगल्यात सकाळी ७ पासून इन्कम टॅक्स अधिकारी दाखल झालेत. तर दुसरीकडे पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजवरही इन्कम टॅक्स विभागाची धाड पडलीय.

सकाळी सात वाजल्यापासूनच इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी इथे दाखल झालेत. मेडिकल कॉलेजच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आलंय.