इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या अभियंता तरुणीची हत्या

हिंजेवडीमध्ये अभियंता तरुणीची हत्या झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडलीये. इन्फोसिस कंपनी मध्ये ही युवती कामाला होती. 

Updated: Jan 30, 2017, 08:35 AM IST
इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या अभियंता तरुणीची हत्या title=

पुणे : हिंजेवडीमध्ये अभियंता तरुणीची हत्या झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडलीये. इन्फोसिस कंपनी मध्ये ही युवती कामाला होती. 

फेज 2 हिंजेवडीमध्ये हि कंपनी असून कंपनीमध्ये तिचा मृतदेह आढळला. या तरुणीचे नाव रसीला राजू ओपी असं असून ती मुळची केरळची आहे. रसीलाचा कॉम्प्युटरच्या वायरने गळा आवळून खून करण्यात आलाय.. 

इन्फोसिस कंपनीच्या नवव्या मजल्यावील मिटिंग रुममध्ये ही घटना घडलीये.. दरम्यान या हत्येप्रकरणी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलंय.