सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकली, डोळ्याला दुखापत

इंदापूरचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडलीय. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं ही घटना घडली.

Updated: Aug 8, 2014, 03:04 PM IST
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकली, डोळ्याला दुखापत title=

इंदापूर:  इंदापूरचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडलीय. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं ही घटना घडली. या शाई हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांना बारामतीच्या काटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

हर्षवर्धन पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या इंदापूरमधील भिगवण इथं एका कार्य़क्रमासाठी जात होते. यावेळी काही लोकांमध्ये झटापटही झाली. त्यात हर्षवर्धन जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

या घटनेनंतर इंदापूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. काँग्रेस कार्य़कर्ते संतप्त झाले असून त्यांनी रास्तारोको केलाय. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.