राज्यप्राणी 'शेकरू'ची वनविभागातर्फे गणना सुरू

महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकरुची ओळख... या शेखरुची गणना यापूर्वी फक्त भिमाशंकर अभयारण्यात करण्यात आली होती. पण आता पहिल्यादाच संपूर्ण महाराष्ट्रातील अभयारण्यात शेकरुंची गणना वन्यजीव विभागामार्फत एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे.

Updated: Apr 19, 2015, 11:05 PM IST
राज्यप्राणी 'शेकरू'ची वनविभागातर्फे गणना सुरू title=

कोल्हापूर: महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकरुची ओळख... या शेखरुची गणना यापूर्वी फक्त भिमाशंकर अभयारण्यात करण्यात आली होती. पण आता पहिल्यादाच संपूर्ण महाराष्ट्रातील अभयारण्यात शेकरुंची गणना वन्यजीव विभागामार्फत एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे.

शेकरु म्हणजेच उडती खार... खारींची ही प्रजाती फक्त भारतात सापडते. करडी-महाखार, दुरंगी-महाखार आणि फिकट–पिवळसर महाखार अशा हिच्या तीन प्रजाती... भिमाशंकर आणि फणसाडच्या जंगलात या खारी प्रामुख्यानं आढळतात. मात्र राज्यातील इतर जंगलांतही त्यांचं दर्शन घडलंय. त्यामुळे वन्यजीव विभागानं त्यांची गणती करण्याचा निर्णय घेतलाय. 

१८ ते २३ एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व अभयारण्यात एकाच वेळी त्यांची गणती होणार आहे. शेकरु विविध वनस्पतींची फळे, फुले आणि पाने खाते क्वचितच जमीनीवर उतरते. पॅराशूटप्रमाणे ती एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर विहार करते.

सुरवातीला ट्रांसेक्ट लाइन पधतीनं पूर्वी तिची गणना केली जायची मात्र आता शेकरुंची घरटे मोजून ही गणना केली जाणार असल्याची माहिती वन अधिकारी बी. एच. पाटील यांनी दिली.

वन्यजिव विभागानं सुरु केलेल्या या गणनेमुळं आपल्या राज्याचा राज्यप्राणी असलेल्या शेकरुंची नेमकी संख्या किती आहे हे कळणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.