इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले, स्थानिक आमदारांचे मौन

इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले आहे. तीन दिवस उलटून सुद्धा पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी तहसिल  कार्यालयावर काढला मूक मोर्चा काढला.

Updated: Aug 16, 2016, 07:25 PM IST
इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले, स्थानिक आमदारांचे मौन title=

पुणे : इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले आहे. तीन दिवस उलटून सुद्धा पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी तहसिल  कार्यालयावर काढला मूक मोर्चा काढला.

पोलीस निरीक्षकांवर कारवाई न झाल्यास इंदापूर तालुका बंद ठेऊन जनआंदोलन करून रस्ता रोकोची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे.

खासगी गाडीचा टोल मागितल्यावरुन इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या चार गुंडानी सरडेवाडी येथे टोल कर्मचाऱ्याला रिव्हाल्व्हर रोखुन मारहाण केली होती. 

घटनेच्या दिवशी रात्री पावणे एकच्या सुमारास स्कार्पिओ गाडी सोलापूरच्या बाजूने टोल नाक्यावर आली. यामध्ये चार जण होते. त्यात इंदापूरचे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे हे गणवेशात होते गाडीच्या चालकाला टोल मागितल्याने राग आल्याने त्यातील अनोळ्ख्या गुंडानी आणि पोलिस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी गाडीतुन उतरून टोल कामगाराला मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शिंदे यांनी टोल कामगार नवनाथ तरंगे यांच्या डोक्याला बंदुक लावून जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तीन दिवस उलटून गेल तरी मधुकर शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने इंदापुरातील सर्वपक्षीय संतप्त नागरिकांनी आज शहरातून तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढून शिंदे यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.