इंदापूरमध्ये दलित कुटुंबावर हल्ला

पुरोगामी महाराष्ट्राचे समतेचे जनक असणाऱ्या शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये दलित कुटुंबावर हल्ला झाला. 

Updated: Jun 27, 2015, 11:42 PM IST
इंदापूरमध्ये दलित कुटुंबावर हल्ला  title=

पुणे : पुरोगामी महाराष्ट्राचे समतेचे जनक असणाऱ्या शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये दलित कुटुंबावर हल्ला झाला. 

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावातल्या भिंगारदिवे आणि कांबळे या दलित कुटुंबांना शेतीच्या वादातून जबर मारहाण करण्यात आली. यात दहा जण जखमी झालेत, यात महिलांचाही समावेश आहे. 

तसंच त्यांचं घरही जाळण्यात आलं. आपल्यावर हल्ला होणार आहे अशी तक्रार या दलित कुटुंबाने बावडा पोलिसांत दिली होती. मात्र पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. यामुळे या दलित कुटुंबाला या प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचं बोललं जातंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.