कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको

 फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तसेच मोर्चाचे आयोजन केलेय.

Updated: Jan 11, 2016, 09:33 AM IST
कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको title=

कल्याण : फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तसेच मोर्चाचे आयोजन केलेय.

शिवाजी चोक ते महात्मा फुले चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र, याला विरोध होत आहे. कारवाईच्या नावाखाली १५ दिवस आधी सर्व दुकानदारांना नोटीस धाडण्यात आल्या होत्या. १९८०च्या डीपी प्लॅन प्रमाणे हा रस्ता रुंद होणार असून पुनर्वसनबाबत सुद्धा ठळक पणे नमूद करण्यात आले होते. मात्र व्यापाऱ्यांमधील एका गटाने थेट गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनामध्ये आणल्याने आणि मंत्री महोदयांनी सुद्धा आव्हानात्मक भाषा वापरल्याने वाद चिघळला.

तसेच शुक्रवारी  कारवाई सुरु करण्यात आली. मात्र अचानक दुपारी पोलीस बंदोबस्त काढून टाकण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन स्थगिती दिल्याची अफवा सोशल मीडियावर फसरविण्यात आली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. दरम्यान,  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर गोंधळ दूर झाला.

कारवाई सुरुच असल्याने व्यापाऱ्यांनी नवा वाद उकरुन काढला, असा आरोप आता व्यावाऱ्यांवर होत आहे. काल संध्याकाळी अचानक व्यापाऱ्यांनी फेरीवाले मारहाण करत असल्याचं आरोप करत रास्ता रोको केला. दरम्यान, कारवाईला कल्याण-डोंबिवली करांचा पाठिंबा दिसून येत आहे.