उपवनात रासलीला, सत्यम लॉजच्या पाडकामाला सुरुवात

ठाण्यात सापडलेल्या सत्यम लॉजच्या काळ्या धंद्यावर अद्यापही ठाण्यातले पोलिस मात्र मूग गिळून गप्प आहेत.

Updated: Dec 2, 2016, 01:28 PM IST
उपवनात रासलीला, सत्यम लॉजच्या पाडकामाला सुरुवात title=

ठाणे : ठाण्यात सापडलेल्या सत्यम लॉजच्या काळ्या धंद्यावर अद्यापही ठाण्यातले पोलिस मात्र मूग गिळून गप्प आहेत. उपवन परिसर वर्तकनगर पोलिसांच्या हद्दीत येतो. आता सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 अनधिकृत खोल्या सापडल्या आहेत. तरी याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे तोडकाम जरी जोरात सुरू असलं, तरी पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सत्यम लॉजसोबत पाच लेडीज बार, इतर ८ लॉज, २५ ढाबे, १० हॉटेल शेड, २५ गॅरेजेस, ३० फर्निचर शोरूम्स जमीनदोस्त करण्यात आले.