अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ सहाय्य्क आयुक्तांसह ८ जणांवर गुन्हा

कागदपत्रात फेरबदल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २ सहाय्य्क आयुक्तांसह  इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 30, 2017, 04:41 PM IST
अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ सहाय्य्क आयुक्तांसह ८ जणांवर गुन्हा title=

वसई : कागदपत्रात फेरबदल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २ सहाय्य्क आयुक्तांसह  इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसई विरार शहर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता भोईर, मेरी तुस्कानो कनिष्ठ अभियंता रमेश घरत कनिष्ठ कर लिपिक राजु मसळे अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. 

शासकीय यंत्रणा आणि ग्राहकांची पसवणूक, स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी सिडकोची बनावट सीसी बनवण्यात आली. तसेच वसई विरार पालिकेच्या कर आकारणी विभागाकडे सादर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.