पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ

 पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.

Updated: May 13, 2015, 03:23 PM IST
पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ title=

गडचिरोली : पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.

महिन्याभरापूर्वी झालेल्या या हत्येप्रकरणी महिलेच्या पतीला बेड्या ठोकण्यात आल्यात. १६ एप्रिल रोजी आरमोरी तालुक्यातल्या जंगलात एका महिलेचा पाय आणि हात असे अवयव सापडले होते. त्यानंतर काही दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यात महिलेचे अवयव मिळाले होते. 

वेगवेगळ्या जंगलांमध्ये आढळलेल्या अवयवांच्या नखांवर एकाच पद्धतीचं नेलपॉलिश होतं. यावरून पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाच्या तक्रारी तपासल्या.

हीना बोकाडे यांच्याबाबत तक्रारीमध्ये संशय आल्यानं त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. तिच्या माहेरी तपास केल्यानंतर हिना असंच नेलपॉलिश वापरत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती सुधीर कोहाडेच्या घरावर छापा टाकला. त्यात ती नेलपॉलिशची बाटली सापडली.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच सुधीरनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली... आणि या प्रकरणाचं गूढ उकललं.

मिसकॉलवरून झाली होती हीना - सुधीरची भेट... 
विशेष म्हणजे, एका मिसकॉलवरून हीना आणि सुधीर यांची भेट झाली होती... त्यानंतर मैत्री, लिव्ह इन रिलेशन आणि मग लग्न असा त्यांच्या नात्याचा प्रवास होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.