मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतलीय.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अजूनही मदत का दिलेली नाही? असा सवाल मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला केलाय.
याबाबत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देत मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला खडसावलंय.
महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 5698 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैंकी, 2731 कुटुंबांना अजूनही मदत पोहचलेली नाही. सरकारच्या या दिरंगाईची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वत:हून दखल घेतलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.