महाड : महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.
बुधवारी सांयकाळी सूर्यास्ताच्या आधी वाहनाचा शोध लागण्याची शक्यता वाढली होती, मात्र पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत.पाऊस आणि पाण्याचा जोर यामुळे एसटी बस आणि इतर खासगी वाहनांचा शोध घेण्यात अडथडे येत आहेत.