अंबरनाथ : एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.
संजय चौधरी आणि त्यांची पत्नी मुलगी राणी आणि २ वर्षांचा मुलगा अनुज हे या दुर्घटनेत ९० टक्के भाजलेत. त्यांच्यावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रात्री घडली असून पोलीसानी रात्री घटना स्थळी धाव घेऊन या चौघांना रुग्णालयात दाखल केले.
मात्र या कुटुंबियांनी स्वतःला का जाळून घेतले. याबाबत कोणाला काही ही माहिती नाही. पोलिसांनी घरचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केलाय.