धुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके

एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.

Updated: May 6, 2017, 08:43 AM IST
धुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके title=

धुळे : एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.

शेतकऱ्यांना शेतात काम करणे मुश्कील झाले असून , शहरीभागात अनेक रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. रस्त्यावर उन्हाची तीव्रता सहज अनुभवता येत असून जीवाची लाही लाही करणाऱ्या या उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. घामाच्या धारा , बंद वारा आणि उन्हाचे भाजून काढणारे चटके अशी स्थिती धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक पदोपदी अनुभवताय. यावर्षी सतत ४३ अंश सेल्सियस तापमान अनेक दिवस कायम राहण्याचा विक्रमच स्थापिक झाला आहे.