बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांचा राडा, मुख्याध्यापकाच्या कॉलरला हात

येथील वादग्रस्त बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांनी राडा केला आहे. कर्मचाऱ्याच्या फाशीनंतर व्यवस्थापन आपल्या ताठर भूमिकेवर कायम होते. त्यामुळं गोडसे शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली. 

Updated: Sep 21, 2016, 08:55 PM IST
बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांचा राडा, मुख्याध्यापकाच्या कॉलरला हात title=

नाशिक : येथील वादग्रस्त बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांनी राडा केला आहे. कर्मचाऱ्याच्या फाशीनंतर व्यवस्थापन आपल्या ताठर भूमिकेवर कायम होते. त्यामुळं गोडसे शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली. 

आपले येथे काही काम नाही अशा शब्दात प्राचार्यांनी खासदारांना खडसावले. त्यामुळं संतापलेल्या खासदार गोडसेंनी प्राचार्यांची कॉलर पडकडून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. आदोलन करणा-या कर्मचा-याने व्यवस्थापनाविरोधात देवळाली पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

नाशिक शहरात इंग्रजी शाळांचे व्यवस्थापन नेहमीच वादग्रस्त ठरलंय. कधी पालकांचं शोषण तर कधी कर्मचा-यांचं आर्थिक शोषण यामुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत. आज देवळालीतल्या बार्न्स स्कूलमध्ये कर्मचा-याचा आत्महत्येनं खळबळ उडालीय. 

देवळाली परिसरातही ही बार्न्स स्कूल, या शाळेत अनेक सेलिब्रिटींची मुलं शिकतात. आज या शाळेत एका कर्मचा-याने झाडाला लटकून फाशी घेतली. शाळेच्या व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. आर्थिक आणि मानसिक शोषण केलं जात असल्याचा आऱोप आहे. 

या शाळेतील सफाई कामगार, शिपाई, सुरक्षारक्षक अशा विविध 94 कर्मचा-यांना तुटपुंजा पगारात काम करावं लागतंय. पगारवाढ मागितली पण देण्यात आली नाही. म्हणून कर्मचा-यांनी संघटीत होऊन संप पुकारला. तर संपकरी 94 जणांना एकाच दिवशी कामावरून कमी करण्यात आलं. शिक्षण उपसंचालक, कामगार न्यायालय, शिक्षणमंत्री अशा सर्वांकडे तक्रारी केल्या पण न्याय मिळाला नाही. अखेर या कर्मचा-यांनी शाळेविरोधात उपोषण सुरू केलं. आठ महिन्यांपासून हे उपोषण सुरू आहे.