त्याला पक्षाचा AB फॉर्म मिळाला, पण...

पक्षीय बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केल्या नाहीत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2017, 10:58 PM IST
त्याला पक्षाचा AB फॉर्म मिळाला, पण... title=

अमरावती : पक्षीय बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केल्या नाहीत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना AB फार्म देण्यात आले.

अमरावती महापालिकेच्या फ्रेजरपुरा या प्रभागातून काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवार चेतन वानखडे यांना उमेदवारी मिळाली मात्र इंटरनेट स्लो असल्याने ऑनलाईन फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी आल्यानं वानखडे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. 

ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने मॅन्युअली अर्ज स्वीकारावा अशी विनंती त्यांनी केली आहे. महापालिकांच्या कार्यालयात अशा अनेक तक्रारी येत आहेत मात्र स्थानिक अधिकाऱ्यांना कुठलेच अधिकार नसल्याने तक्रार थेट निवडणूक  आयोगाकडे करण्याचा सल्ला संबंधित अधिकारी देत आहेत.