हँड ग्रेनेड सापडल्यानं नांदेडमध्ये खळबळ

नांदेड शहरातील दीपनगर मध्ये हँडग्रेनेड सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 23, 2016, 07:16 PM IST
हँड ग्रेनेड सापडल्यानं नांदेडमध्ये खळबळ title=

नांदेड : नांदेड शहरातील दीपनगर मध्ये हँडग्रेनेड सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दीपनगर येथे एका ठिकाणी टाकण्यात आलेले नारळाचे फन वृद्ध महिलेने जाळण्यासाठी घरी नेले होते. 

नारळाच्या फनामध्ये त्यांना हँड ग्रेनेड सदृश वस्तू आढळली. ही माहीती पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथक दाखल झालं. 

त्या वस्तुची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी जाऊन बॉम्बशोधक पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून ती वस्तू नष्ट केली. याबाबत एटीएस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करताहेत.