सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची धुळे कारागृहात जाऊन भेट घेतली. 

Updated: Aug 9, 2016, 01:23 PM IST
सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट title=

धुळे : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची धुळे कारागृहात जाऊन भेट घेतली. 

पाटील यांनी यापूर्वीही सुरेश जैन यांची भेट घेतली होती. मात्र आता मंत्रिपदावर आरुढ झाल्यानंतर पाटील यांनी जैन यांची भेट नेमकी कशासाठी घेतली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलाबराव पाटील यांनी जैन यांच्याशी बंद खोलीत अर्धातास चर्चा केली. याभेटीबाबत धुळ्यातल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांना कुठलीही कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळं पुढच्या काळात जळगावच्या राजकारणात काही हालचाली होतील आणि समीकरणं बदलतील अशी चर्चा या भेटीमुळं रंगली आहे. 

या दोघांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात असले तरी खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यावर वर्चस्वासाठी राजकीय खेळी रंगणार आहेत. त्यामुळं ही भेट लक्षवेधी ठरलीय.