परभणी : परभणीतील राणी सावरगाव गावात नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, यानंतर वधुच्या गळ्यात वरमाला टाकली. बब्रू अप्पा झोरे असं या नवरदेवाचं नाव आहे.
नवरदेवाचं लग्न गावातच होतं. बब्रू आप्पा झोरे यांनी गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव जिल्हा परिषद शाळेवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर बब्रू झोरे यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला. त्यांनी लग्नाआधी मतदानाचं काम पूर्ण केलं. परभणी जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, त्यासाठी या नवरदेवाने मतदान केले.