गोवा : काँम्रेड पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीच्या गोव्यात सनातनच्या फरार आरोपींची चौकशी केली. रामनाथी आश्रमात जाऊन ही चौकशी करण्यात आली.
सनातनचा कारभार पाहणारे दुर्गेश सामंत, पांडुरंग मराठे आणि विरेंद्र मराठे यांची चौकशी केलीय. संस्था प्रमुख जयवंत आठवले यांच्यासह या सर्वांची चौकशी करण्यात आली. 'इन कॅमेरा' ही चौकशी करण्यात आली.
पोलीस सतत छळ करत असल्याचा आरोप 'सनातन'कडून वारंवार केला जातोय. त्यामुळेच एसआयटीच्या पथकानं गोव्यातल्या पथकानं स्थानिक पोलिसांसह इन कॅमेरा ही चौकशी केली. चौकशीचा एसआयटीकडून बंद लिफाफ्यातून कोर्टात सादर केला जाणा आहे.
दरम्यान सनातनच्या जारी केलेल्या पत्रकात जयंत आठवलेंची चौकशी झालेली नसल्याचं दावा केलाय.