सरकार त्या मांत्रिकांना देणार मानधन

मेळघाटमधील विविध आजार आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यानं नामी शक्कल लढवलीय.

Updated: Jan 2, 2017, 08:25 PM IST
सरकार त्या मांत्रिकांना देणार मानधन  title=

मेळघाट : मेळघाटमधील विविध आजार आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यानं नामी शक्कल लढवलीय. मंत्र-तंत्राच्या आधारे उपचार करणा-यांना मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

मेळघाटमधल्या अशा सुमारे 325 भूमका यांना राज्य सरकारनं प्राथमिक आरोग्याबाबतची माहिती दिली आहे. मेळघाटमध्ये आजही रुग्णांना भूमका म्हणजे मंत्रिकाकडे उपचारासाठी घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यामुळं राज्य सरकारनं अशा 325 भूमका यांना हाताशी धरत त्यांना आरोग्याबाबतची माहिती दिली आहे.

भूमकाकडे आलेल्या रुग्णांना जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात घेऊन आणायची जबाबदारी सोपवली आहे. प्रत्येक रुग्णामागे भूमकाला राज्य सरकार 200 रुपये देणार आहे. यामुळे गावातील बालमृत्यू कमी होतील असा विश्वास सरकारने केला आहे.