औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की

शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झालीय. रुग्णाचे प्लास्टर बदलण्यावरून रविवारी रात्री 4 रुग्णांनी डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर तिथून वेळीच निघून गेल्यानं अनर्थ टळलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2017, 03:06 PM IST
औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की  title=

औरंगाबाद : शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झालीय. रुग्णाचे प्लास्टर बदलण्यावरून रविवारी रात्री 4 रुग्णांनी डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर तिथून वेळीच निघून गेल्यानं अनर्थ टळलाय.

रुग्णाचे नातेवाईक दारू पिऊन होते असा आरोप डॉक्टरांनी केलाय. प्लास्टर कापण्याची रेजर घेऊन डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रयत्न केल्याचंही डॉक्टारांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

अशा घटना वारंवार घडताय त्यामुळं डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल उचलली जात नाहीत. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहिलं असा इशारा निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिलाय. डॉ. विवेक बडगे आणि डॉ. उमेश काकडे यांच्यासोबत रुग्णांनी गैरवर्तणूक केला.