गोंदिया: जिल्ह्यातल्या तीनशेच्यावर गावकऱ्यांनी जंगलातच आपलं बिऱ्हाड थाटलंय. नवेगाव राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या चार गावातल्या तब्बल तीनशेच्यावर गावकऱ्यांनी बिऱ्हाड थेट जंगलात हलवलंय.
कालीमाटी, कवलेवाडा, झंकारगोंदी आणि कुमडीमेंढा या चार गावांना पुनर्वसन पॅकेज न मिळाल्यानं गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोलेंकडेही गावक-यांनी विनंती अर्ज केले मात्र काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत गाव न सोडण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय.
गावकऱ्यांनी प्रवेश करताच गावकऱ्यांना शेती करता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात आग लावली. त्यात जवळपास शंभर हेक्टरवर कुरण आणि झाडं जळालीयत. गावकऱ्यांनी जंगलात बिऱ्हाड मांडल्यामुळं जिल्हा प्रशासन आणि वन विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय.
गावकऱ्यांनी जंगलात मोर्चा वळवल्यामुळं मनुष्य आणि वन्यप्राण्यात संघर्ष दिसू शकतो. त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर यात लक्ष घालवं एवढीच अपेक्षा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.