पोटातल्या जीवाची पर्वा न करता 'ती'नं रानडुक्कराला हुसकावून लावलं!

शेतात जात असलेल्या गोंदियातल्या एका शेतक-यासमोर रानडुकराच्या रुपात काळ आला होता. मात्र त्या कठिण प्रसंगी त्याला आकस्मिकपणे जीवदान मिळालं.

Updated: Aug 28, 2015, 12:46 PM IST
पोटातल्या जीवाची पर्वा न करता 'ती'नं रानडुक्कराला हुसकावून लावलं! title=

माधव चंदनकर, गोंदिया : शेतात जात असलेल्या गोंदियातल्या एका शेतक-यासमोर रानडुकराच्या रुपात काळ आला होता. मात्र त्या कठिण प्रसंगी त्याला आकस्मिकपणे जीवदान मिळालं.

गोंदियामधल्या तेढवा गावातले दुर्योधन सिहमारे आणि त्यांची पत्नी बसंताबाई सिहमारे, नेहमी प्रमाणे आपल्या शेळ्या आणि दोन म्हशी घेऊन शेतात गेले होते. तेवढ्यात दुर्योधन आणि बसंताबाई सिहमारे यांचावर पाठीमागून एका रानडुकरानं हल्ला चढवला. 

अधिक वाचा : आरोपी फरार झाले म्हणून शेळीला अटक

काही समजण्याचा आत रानडुक्कराने त्यांना जमिनीवर लोळविले. बसंताबाईही या हल्ल्यात जखमी झाल्या. दुर्योधन सिहमारे यांनाही बराच मार लागला. अशातच त्यांनी भुरी - कारी या दोन म्हशींना वाचव म्हणून हाक मारली... आणि मालकाच्या मदतीसाठी या दोन्ही म्हशीही धावून आल्या... त्यांनी रानडुक्करावर जोरदार हल्ला चढवून त्यांनी  त्याला हुसकावून लावलं, असा घडलेला प्रकार बसंताबाई यांनी सांगितला.  

अधिक वाचा : शेळीची हत्या; कुत्रा वॉन्टेड!

भुरी आणि कारी या दोन म्हशींनी आपल्या मालकांचे प्राण वाचवले. मात्र, यात गाभण असलेल्या भुरी म्हशीला इजा झालीय. आपल्या पोटात वाढत असलेल्या जीवाची पर्वा न करता तिने रानडुकराशी दोन, दोन हात केले.

या मुक्या जीवांमुळे सिहमारे कुटुंबाचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. शब्दां पलिकडचं गहि-या भावनांचं हे नातं म्हणूनच विशेष आहे. 

अधिक वाचा : शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.