सोलापुरात गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

मुसळधार पावसाचा फायदा घेऊन हिप्परगावामध्ये गणपती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला. सोन्याचा कळस चोरट्यांनी गुरुवारी रात्री लंपास केला.

Updated: Jul 21, 2016, 12:21 PM IST
सोलापुरात गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला title=

सोलापूर : मुसळधार पावसाचा फायदा घेऊन हिप्परगावामध्ये गणपती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला. सोन्याचा कळस चोरट्यांनी गुरुवारी रात्री लंपास केला.

चोरी झालेला कळस तब्बल २५ तोळ्यांचा असल्याची माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी गणपती मंदिरातील कळस लांबवला. 

गणपती मंदिराच्या शेजारी लक्ष्मीमातेचे मंदिर आहे. या मंदिरातील देखील कळस चोरण्याचा प्रयत्न केला होता. गावातील भाविकांच्या हा कळस गणपती मंदिरावर चढविला होता. पुजारी सकाळी मंदिरात आल्यानंतर कळस चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.