परभणी : अकबर-बिरबलच्या स्टोरी पेक्षाही मजेदार किस्सा परभणी जिल्ह्यातल्या पाथरीत घडला आहे. इनायत शेख यांची शेळी चोरीला गेली, इनायत यांनी शेळी चोरीची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली.
आरोपी नसीब खानचं नशीब चांगलं होतं
या प्रकरणी एलसीबी पोलिसांनी पाथरीपासून ४० किलोमीटर अंतरावर तीन जणांना ताब्यात घेतलं, त्यापैकी दोन जण पोलिसांच्या हातावर तुरीदेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात उरला फक्त नसीब खान, मात्र त्याचं नशीब चांगलं होतं, त्याला कोर्टाने जामीनावर सोडलं.
शेळी चोर सुटला, मात्र शेळी तुरूंगातच
शेळी चोर सुटला, मात्र शेळी तुरूंगातच होती, १७ तास उलटूनही ती कारागृहातच होती. म्हणून बाल गुन्हेगारांना सुधारगृहात पाठवतात, तसं शेळीलाही कारागृहातून गुरांच्या कोंडावळ्यात कोंडून ठेवण्यात आलं.
आरोपींची माहिती शेळी कशी देणार
आता पोलिस शेळीला मूळ मालकाकडे द्यायला तयार नाहीत, कारण इतर दोन आरोपी त्यांना हवे आहेत, आता इतर दोन आरोपींची माहिती शेळी कशी देणार, जो आरोपी जामीनावर सुटलाय तोच ही माहिती देऊ शकतो. शेळीचे मालक इनायत खान यांना शेळी परत घेण्यासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे.
या शेळीला मूळ मालकाकडे का सोपवत नाही, यावरून पोलिस मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर काहीही बोलायला तयार नाहीत, हा किस्सा बिरबलने ऐकला असता, तर तोही पोट धरून हसला असता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.