सोलापूर : आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना, अकलूज येथील मोहिते-पाटील कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साखर वाटून साजरा केला. शिवरत्न उद्योग समूहाचे अध्यक्ष उदयसिंह मोहिते-पाटील यांचा मोठा मुलगा किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील आणि ईश्वरीदेवी मोहिते-पाटील यांना बुधवारी मुलगी झाली. या कुटुंबियांचा कोण आनंद झाला.
अकलूज शहराच्या विविध भागांमध्ये गुरुवारी सकाळी गजराजाची मिरवणूक काढून घरोघरी साखर वाटत मुलीच्या जन्माचे स्वागत केले. एकीकडे स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना घडत असताना अकलूजच्या मोहिते पाटलांच्या घरात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला. अकलूज शहराच्या विविध भागांमध्ये गुरुवारी सकाळी गजराजाची मिरवणूक काढून घरोघरी साखर वाटत मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं.
पश्चिम महाराष्ट्रात स्त्री-भ्रूण हत्यांचं प्रमाण अधिक आहे. मुलींकडे बघण्याचा मानसिक दृष्टिकोन याला कारणीभूत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांच्या घरात मुलीच्या जन्माचं स्वागत हे समाजाला दिशा देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.