महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.

Updated: Dec 9, 2014, 08:45 AM IST
महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा title=

जळगाव : भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.

गिरीश महाजन यांच्याकडे नुकतंच जलसंपदा मंत्रीपद सोपवण्यात आल्यानं त्यांचे कार्येकर्ते उत्साहात आहेत. याच निमित्तानं मंत्रीसाहेबांच्या मतदारसंघ असलेल्या जामनेरमध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, या मिरवणुकीत अनेक कार्यकर्त्यांच्या उत्साहावर चोरांनी हात मारला.

तब्बल १५ जणांचे खिसे या मिरवणुकीत खिसेकापुंनी साफ केले. या खिसेकापुंच्या टोळीतील एका चोराला रंगेहाथ पकडण्यात कार्यकर्त्यांना यशही आलं. याबाबत, जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलीय.

तब्बल एक लाख ७५ हजार रुपयांची चोरी झाल्याची नोंद करण्यात आलीय. दोन ते तीन तास गावातील मुख्य रस्त्यांवर ही स्वागत मिरवणूक चालली. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी हात साफ केला. अर्थातच, आमदार साहेबांच्या मिरवणुकीपेक्षा चोरांनी केलेल्या सफाईचीच चर्चा सगळीकडे सुरू असलेली दिसली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.