नागपूर : राज्यातील गुंडांना पोलिसांचा धाक नसल्याची जोरदार टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असतानाच त्याचा अनुभव नागपूरला आला. नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद झालाय.
शहरातील गणेशपेठ भागातील एका हॉटेल परिसरात दोन गटांचे भांडण झाले आणि बघता बघता त्या गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील गुंडांनी हाणामारी करत हॉटेल समोरील झाड्यांच्या कुंड्या फोडल्या. या संपूर्ण घटनेतील दृश्य CCTV मध्ये कैद झालंय.
यात या गुंडांचा हैदोस स्पष्टपणे दिसून येतो. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्पर विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा तपास करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.