धक्कादायक: चंद्रपुरात मंदिर परिसरात तरुणीवर गँगरेप

चंद्रपूर शहरालगतच्या घंटाचौकी भागातील जंगलात एका युवतीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आपल्या मित्रासह विष्णू मंदिर परिसरात फिरण्यासाठी आली होती. 

Updated: Jun 15, 2015, 11:28 PM IST
धक्कादायक: चंद्रपुरात मंदिर परिसरात तरुणीवर गँगरेप title=

चंद्रपूर: चंद्रपूर शहरालगतच्या घंटाचौकी भागातील जंगलात एका युवतीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आपल्या मित्रासह विष्णू मंदिर परिसरात फिरण्यासाठी आली होती. 

पोलिसांनी जंगलात दबा धरून बसलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. चंद्रपूर शहरालगत पुरातन विष्णू मंदिर एक पर्यटन स्थळ आहे. या मंदिर परिसरात एका युवतीवर ४ युवकांनी सामूहिक बलात्कार केला. रविवारी संध्याकाळी ५ वाजता हा प्रकार घडला. 

आरोपींनी पीडित मुलीच्या मित्राला बळजबरीनं पकडून ठेवलं होतं. घटनेनंतर आरोपींनी युवतीचा मोबाईल सोबत घेऊन पोबारा केला. चंद्रपूरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मोबाईलचं टॉवर लोकेशन जंगलात दाखवत असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत आरोपींचा शोध सुरु केलाय. आरोपींची ओळख पटली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.