बदलापुरात टोळक्याकडून नागरिकाला जबर मारहाण, लूट

बदलापुरात रात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्यांनी एका नागरिकाला जबर मारहाण करून लुटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 27, 2017, 10:56 PM IST
 बदलापुरात टोळक्याकडून नागरिकाला जबर मारहाण, लूट title=

ठाणे : बदलापुरात रात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्यांनी एका नागरिकाला जबर मारहाण करून लुटलंय. विशेष म्हणजे भर रस्त्यात हा मारहाणीचा प्रकार सुरु होता. सुरेश भगत हे रविवारी रात्री ११च्या सुमारास बदलापूर स्टेशन वरून घरी निघाले होते. 

रस्त्यात सात ते आठ जणांच्या टोळीने भगत यांना जबर मारहाण करून सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि मोबाईल फोन असा ८० हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीत भगत बेशुद्ध झाले  होते. 

दुसऱ्या दिवशी पहाटे ते शुद्धीवर आले. हा सगळा प्रकार शेजारील इमारतीतील नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला. सुमारे १० ते १५ मिनिटे हा सर्व प्रकार सुरु होता. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.