ईव्हीएम मशीनचा वाद हायकोर्टात जाणार

पुण्यात ईव्हीएम मशीनचा वाद वाढत चालला आहे. आता हा वाद  हायकोर्टात जाणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 27, 2017, 10:52 PM IST
ईव्हीएम मशीनचा वाद हायकोर्टात जाणार title=

पुणे : पुण्यात ईव्हीएम मशीनचा वाद वाढत चालला आहे. आता हा वाद  हायकोर्टात जाणार आहे. ईव्हीएम मशिन मधील घोटाळ्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार हायकोर्टात दाद मागणार आहेत. 
सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी बैठक घेतली.  

काँग्रेस , राष्ट्रवादी , मनसे  आणि शिवसेना या पक्षांचे उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच या प्रकारा विरोधात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. 

ईव्हीएम मशीन मधील घोटाळ्याचे पुरावे आहेत. कोर्टात हे पुरावे सादर करणार असल्याचे या उमेदवारांनी यावेळी सांगितले.  या बैठकीला पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.