गडचिरोली नक्षली कारवायांत वाढ, तिघे पोलीस जवान जखमी

जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भामरागड तालुका गेले ४८ तास नक्षल्यांच्या कारवायांनी हादरला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 09:32 PM IST
गडचिरोली  नक्षली कारवायांत वाढ, तिघे पोलीस जवान जखमी  title=

गडचिरोली : जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भामरागड तालुका गेले ४८ तास नक्षल्यांच्या कारवायांनी हादरला आहे. 

या भागातील कोपर्सी-पुलनार जंगलात पोलीस -नक्षल यांच्यात मोठी चकमक उडाली होती. पोलिसांचा वाढत दबाव पाहून नक्षली पसार झाले मात्र या चकमकीत सीआरपीएफचा १ तर जिल्हा पोलीस दलाचे २ जवान जखमी झाले. या तिघांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे रायपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. 

या घटनेनंतर चकमकीतील पोलीस पथकाला मदत पोहचविण्यासाठी जात असलेल्या २ सशस्त्र पोलीस पथकांच्या वाहनाला नक्षल्यांनी कियर गावाजवळ भूसुरुंगाद्वारे उडवून लावले भूसुरुंगविरोधी वाहन असल्याने जवानांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र या पथकातील सुरेश तेलामी या जिल्हा पोलीस दलातील जवानाला वीरमरण आले.