अकरावीच्या ऑनलाइनची दुसरी यादी जाहीर

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झालीय. 

Updated: Jul 6, 2016, 07:07 PM IST
अकरावीच्या ऑनलाइनची दुसरी यादी जाहीर  title=

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झालीय. 

अवघ्या 5 हजार 40 विद्यार्थ्यांना दुस-या यादीत स्थान मिळालंय़. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या 10 हजार 523 विद्यार्थ्यांना बेटरमेंट देण्यात आलंय. यामुळे दुसरी फेरी पार पडूनही तब्बल 16 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. 

वाढलेले कट ऑफ आणि त्यामुळे वाढलेली स्पर्धा दुस-या फेरीतही दिसून येतेय. अनेक महाविद्यालयांचे कट ऑफ दुस-या फेरीतही कमी झालेले नाहीत. 

आता तिस-या फेरीत 16 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं आव्हान केंद्रीय प्रवेश समितीसमोर असणार आहे.