पुणे मेट्रो भूमिपूजन राजकीय वाद, 'मोदींनी न करता पवारांनी करावे'

पुणे मेट्रोच्या भूमिपुजनावरून राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपुजन करण्याचा प्रस्ताव, महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं मंजूर करण्यात आला आहे. 

Updated: Dec 8, 2016, 12:00 AM IST
पुणे मेट्रो भूमिपूजन राजकीय वाद, 'मोदींनी न करता पवारांनी करावे' title=

पुणे : पुणे मेट्रोच्या भूमिपुजनावरून राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपुजन करण्याचा प्रस्ताव, महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमतानं मंजूर करण्यात आला आहे. 

या प्रस्तावाला राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि मनसेनंही पाठिंबा दिला आहे. तर पंतप्रधानांच्याच हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपुजन करण्याचं भाजपनं याआधीच जाहिर केलं होते. त्यामुळे श्रेयवादाची ही लढाई चांगलीच रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. 

केंद्रीय मंत्रिमंडळानं पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. गेल्या सात वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. मात्र आता मंजुरीमुळे हा प्रकल्प ख-या अर्थानं रुळावर आला आहे.