ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातली आग विझली

ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाडा परिसरात लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.

Updated: Mar 14, 2017, 11:12 PM IST
ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यातली आग विझली  title=

ठाणे : ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाडा परिसरात लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. कोळीवाड्यातली सिडको बस स्टॉपजवळ एका घराला ही आग लागली होती. आगीचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.