नाशिक : नाशिककरांवर लादण्यात आलेली ३० टक्के पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे.
पाणीकपातीच्या मुद्द्यावर प्रशासनाने थेट यूटर्न घेतलाय. गंगापूर धरणात कमी पाणीसाठा असल्याचं कारण देत प्रशासनाने पाणीकपात १५ टक्क्यांवरून ३०टक्के केली होती.
मात्र याबाबत लोकप्रतिनिधींना अजिबात विश्वासात घेण्यात आलं नाही. याबाबत अधिका-यांना जाब विचारताच ती केवळ अधिका-यांची चर्चा होती असं सांगत प्रशासनाने पाणीकपात होणार नसल्याचं सांगितलं.
दरम्यान, पाणीकपात मागे घेतली तरी भविष्यात पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे संकेतही प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेत.