पुणे : पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली.
दोन्ही बाजुंकडून चतुश्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून नऊ कार्यकर्त्यांना यासंदर्भात अटक करण्यात आलीय.
दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमध्ये जेएनयूचा वादग्रस्त विद्यार्थी उमर खालीदला बोलावण्यास अभाविपनं विरोध केलाय... आणि याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपनं निदर्शनं केली.
त्यानंतर संध्याकाळी एसएफआयचे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाची पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाल्याचं समजतंय.