जळगावात बनावट पोलिसांचा धुमाकूळ

येथे गेल्या काही दिवसांत बनावट पोलिसांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झालेत.

Updated: Sep 10, 2015, 03:06 PM IST
जळगावात बनावट पोलिसांचा धुमाकूळ title=

जळगाव : येथे गेल्या काही दिवसांत बनावट पोलिसांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झालेत.

पुणे पोलिसांचे बनावट ओळख पत्र तयार करून रस्त्यावर वसुली करणाऱ्या ४ तोतया पोलिसांना वाहतूक पोलिसांनी अटक केलीय. बोलेरो गाडीत पोलिसांचा युनिफॉर्म, काठ्या, चाकू, ब्लेड्स, बंदुकीचे काडतूस आदी साहित्यांसह ६ बनावट पोलीस रस्त्यावर वाहनधारकांकडून पैसे वसूल करण्याच्या प्रयत्नात होते.

यावेळी त्यांना अजिंठा चौकातून वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत. चौघांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय. यापूर्वीही एका आयपीएस अधिकाऱ्यासह दोन वेळा बनावट पोलिसांना जळगावात अटक करण्यात आलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.