पुणे : पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.
दिल्लीत केंद्र आणि राज्यातल्या मत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलीय. पुणे मेट्रो, पुणे विमानतळ आणि रिंगरोड या पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या पायाभूत सुविधांसाठी दिल्लीत महत्वाची बैठक झाली.
केंद्रीय वाहतूक मंत्री व परीवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बोलावलेल्या बैठकीला नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू, पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांच्यासह शरद पवार, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मेट्रो अशी धावणार
अलका टॉकीज आणि पुणे स्टेशन दरम्यान धावणार असून मुठा नदीच्या बाजूने हा मार्ग असेल. यापूर्वी जंगली महाराज रोड मार्गे होता. आता त्यात बदल करण्यात आलाय.
राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०१३ मध्ये पुणे मेट्रो सेवा मान्यता दिली होती. याचे काम २०१२१ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. जून २०१२ मध्ये मंत्रिमंडळाने १४.९२५ किमीसाठी वनाझ ते रामवाडीसाठी पेज-१ मंजूर केला. हा प्रकल्प २०१७ पूर्ण होणे अपेक्षित आहे.
आता या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजित खर्च १०.८१३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता, चिंचवड - स्वारगेट मार्गासाठी रुपये ६.९६० कोटी रुपये खर्च होईल आणि वनाझ ते रामवाडी मार्ग ३.२२३ कोटी रुपये खर्च करणार आहे. दोन्ही मार्गांच्या एकूण खर्चा तब्बल २.१९९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.