बनावट ओळखपत्र अन् आमदार पाटलांचा 'प्रकाश'!

माजी आमदार असल्याचं बनावट ओळखपत्र तयार करून सरकारी सवलतींचा फायदा घेण्याचा प्रकार उघड झालाय.

Updated: Dec 6, 2014, 07:02 PM IST
बनावट ओळखपत्र अन् आमदार पाटलांचा 'प्रकाश'! title=

सोलापूर : माजी आमदार असल्याचं बनावट ओळखपत्र तयार करून सरकारी सवलतींचा फायदा घेण्याचा प्रकार उघड झालाय.

सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार शामराव पाटील यांच्या ओळखपत्रावर स्वतःचा फोटो चिकटवण्याचा प्रकार त्यांचा मुलगा प्रकाश पाटील याने केलाय. शामराव पाटील हे महाराष्ट्राचे माजी आमदार आहेत. १९७८ मध्ये ते जनता दलाचे आमदार होते. मात्र त्यांचा मुलगा प्रकाश पाटील हा कधीही आमदार नव्हता तरीही ते माजी आमदार म्हणून आयकार्ड मिरवत वावरत आहेत. या बोगस ओळखपत्राच्या आधारे त्यांनी अनेक शासकीय फायदे घेतल्याचा संशय आहे. 

‘झी २४ तास’ने हा बनाव उघडकीस आणल्यानंतर प्रकाश पाटील यांनी या सर्व प्रकाराचा इन्कार केला. आपण हा प्रकार केला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पण, ‘झी २४ तास’च्या हाती या बनावट आयकार्डची प्रत लागली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.