भुजबळांनंतर राष्ट्रवादी आमदार रमेश कदमांच्या संपत्तीवर जप्ती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा नंबर लागला आहे.

Updated: Apr 1, 2016, 03:05 PM IST
भुजबळांनंतर राष्ट्रवादी आमदार रमेश कदमांच्या संपत्तीवर जप्ती  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने केलेली कारवाई ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा नंबर लागला आहे.

राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची संपत्ती ईडीने काहीच दिवसांपूर्वी जप्त केली होती. आता सोलापूर मोहोळचे आमदार असणाऱ्या कदम यांच्यावरही हीच नामुष्की ओढवली आहे. त्यांची तब्बल १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

२०१२ ते २०१४ साली अध्यक्ष असताना अण्णाभाऊ साठे महामंडळात ३०० कोटींहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. 

रमेश कदम आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेला त्यांच्या बोरीवलीतील फ्लॅट, औरंगाबादमधील जमीन, ७६ कोटी ६७ लाखांची बँकेतील रोख रक्कम, इक्विटी शेअर, मुंबईच्या महागड्या पेडर रोड येथील जमीन ही सर्व मालमत्ता आता ईडीच्या आदेशानुसार जप्त होणार आहे. 

रमेश कदम आणि त्यांच्या साथीदारांनी तसेच महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करुन हा घोटाळा केला, असा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी कदम यांच्याकडे १८० दिवसांचा कालावधी आहे.