अलिबाग : बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला लिकर किंग विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयानं आणखी एक दणका दिलाय.
ईडीनं अलिबाग तालुक्यातल्या मांडवा कोळघरमधलं मल्ल्याच्या फार्महाऊस जप्ती आणलीय. या मालमत्तेची किंमत १०० कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येतंय.
मांडवा कोळघरच्या समुद्रकिनारी तब्बल १७ एकर जागेमध्ये मल्ल्याचं हे अलिशान फार्म हाऊस आहे. ही मालमत्ता 'मेसर्स मांडवा फार्मस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या नावावर आहे.
तब्बल दोन ते अडीच तास ईडीच्या पथकानं इथं तपासणी केली. 'मांडवा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड'नं जप्तीच्या विरोधात केलेली याचिका दोन दिवसांपूर्वी फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली.