ठाणे : झाडांची कत्तल न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी ठाणेकर पुढं सरसावलेयत.
एस टी कॉलनीमधल्या मुलांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. कुठल्याही झाडाची कत्तल न करता जमीनीवर पडलेला पालपाचोळा एकत्र करून त्या माध्यमातून होळी साजरी करण्याचं या बच्चेकंपनीनं ठरवलंय.
इतकंच नाही तर सर्वांनाच पर्यावरण पुरक होळी साजरी करण्याचं आवाहन या मुलांनी केलंय.