मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.  

Updated: Apr 8, 2016, 09:01 AM IST
मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती  title=

ठाणे : मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेय. तर रांगोळीच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती तसच पाणी टंचाईच्या विषयी जनजागृती करण्यात येत आहे.

हिंदू नववर्ष्याचं स्वागत करण्यसाठी सगळीकडेच जय्यत तयारी होत असतना ठाण्यात देखील नाववार्ष्याच स्वागतासाठी संस्कार भारतीच्यावतीने एक भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आलीय. ठाण्यातील गावदेवी मैदान इथं ही रांगोळी काढण्यात आलीय. रांगोळीच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती तसच पाणी टंचाईच्या विषयी जनजागृती व्हावी या करता जलसाक्षरता हा विषय प्रभावी पाने मांडण्यात आलाय.

संस्कार भारतीच्या ५० हून अधिक सदस्यांनी सदरची रांगोळी १२ तासांच्या अथक प्रयत्नांनी काढलीय. हिंदू नववर्ष्याचं स्वागत करण्यसाठी सगळीकडेच जय्यत तयारी होत असतना ठाण्यात देखील नाववार्ष्याच स्वागतासाठी संस्कार भारतीच्यावतीनं एक भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आलीय. ठाण्यातील गावदेवी मैदान इथं ही रांगोळी काढण्यात आलीय. 
 

तर डोंबिवलीतल्या श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी नववर्ष स्वागत निमित्तानं विविध उपक्रम आखले जातात. त्याचाच भाग म्हणून यावर्षी गणेश मंदिर संस्थानतर्फे मंदिरामध्ये महारांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी तब्बल ४८ फूट बाय १२ फुटांची आहे. या विशाल रांगोळीसाठी ७०० किलो रांगोळी आणि ३०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रांगोळीतून पाणी वाचवायचा महत्त्वपूर्ण संदेशही दिला गेला आहे. पाण्याची विविध १२ नावं या रांगोळीतून चितारण्यात आली आहेत.